Articles


दिवाळीस लक्ष्मी-कुबेर कृपाप्राप्तीस मुहूर्तवेळ.....

नागपूर : दरवषीं प्रमाणे याववषीं सुध्दा आपण सगळे दिवाळीचा सण मोठया उत्साहाने व आनंदाने साजरा करणार आहोत यात शंका नाही. सगळयांनी आतापासूनच नवीन कपडे, मिठार्इ व फटाके खरेदी केले असतील. या सणाचा ज्योतिषीय दृष्टीकोनातून लक्ष्मी व कुबेर या दोन देवतेची कृपाप्राप्तीसाठी सुध्दा अनन्य साधारण महत्व आहे. कोणतेही कार्य श्रध्दापूर्वक शास्त्रोक्त व योग्य वेळेस केल्यास त्याची फळे आपल्याला अवश्य प्राप्त होतात यात आम्हाला शंका नाही. याचा अनुभव आपणासही घेता यावा हीच श्रीचरणी प्रार्थना. 
दिवाळी या सणामध्ये गोवत्सव्दादशी, यमदिपदान, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन असे चार ते पाच दिवस महत्वाचे असतात. यावर्शी सुर्यसिध्दांतीय पंचांगानुसार गोवत्सव्दादषीची सुरूवात 30 आक्टोबर 2013 ला सायं. 07.15 पासून 31 आक्टोबर 2013 ला सायं. 07.43 पर्यंत आहे. या दिवषी उपरोक्त कालावधीत सायंकाळी सवत्स गायीचे पूजन करून आशीर्वाद घ्यावे. तसेच या दिवशी दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ खावू नये. तांब्याच्या भांडयात पाणी घेऊन त्यात गंधफुल अक्षता घालून पुढील मंत्र म्हणून गायीच्या पायावर ते पाणी घालावे. ''क्षीरोदार्णवसंभूते सुरासुर नमस्कृते । सर्वदेवमये मातगृहाणार्घ्यं नमोस्तुते।।  तसेच 5 उडदाचे वडे पुढील मंत्र म्हणून गायीस खाऊ घालवेत. ''सुरभिस्त्वं जगन्मातर्देवि विष्णुपदे स्थिता । सर्वदेवमये ग्रासं मया दत्तमिदं ग्रस।।  या दिवषीपासून पुढे पाच दिवस गायी, घोडे तसेच घरातील सर्व लोकांस औक्षण करावे.
याच दिवशी यमदिपदानाचे फार महत्व आहे. घरात कोणासही अपमृत्यु येऊ नये म्हणून आषिवन कृष्ण त्रयोदशीस  सांयकाळी घराच्या बाहेर गव्हाच्या पीठात हळद मिसळून केलेला दिवा दक्षिणेकडे ज्योत करून पुढील मंत्र म्हणून लावावा ''मृत्युना पाषदंडाभ्यां कालेन ष्यामया सह । त्रयोदष्यां दीपदानात सूर्यज: प्रीयतां मम ।।  दिपदान सुध्दा वरील निर्देशित वेळेच्या दरम्यानच पार पाडावे. 
नंतर धनत्रयोदशीसाठी मुहूर्त दिनांक 31 आक्टोबर 2013 ला सायं. 7.43 पासून ते 1 नोव्हेंबर 2013 ला सायं. 07.39 पर्यंत आहे. या दरम्यानच धनत्रयोदशी हा सण साजरा करावा. बÚयाच ठिकाणी प्रथेनुसार या दिवषी सुवर्ण तसेच नवीन स्वयंपाकाची भांडी विकत घेवून त्यात धणे भरून त्याचे पूजन करून दुस-या दिवसापासून वापरास घेण्याची प्रथा आहे. याच दिवशी धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवषी धन्वंतरी जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. या दिवषी धन्वंतरीची शोडषोपचार पूजा करून त्यास निरोगी दीर्घायुष्य मिळण्याबाबत प्रार्थना करतात. 
यानंतर नरकचतुर्दशी ची सुरूवात दि. 1 नोव्हें. 2013 ला सायं. 7.39 पासून 2 नोव्हेबर 2013 ला सायं. 07.06 पर्यंत आहे. या दिवषी पहाटे 05.14 पासून पुढे अभ्यंगस्नाननाचे वेळी आघाडा किंवा भोपळयाची पाने नरकनाशार्थ अंगावरून ओवाळून टाकावीत. या दिवषी स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून वडील जिवंत असल्यास पाण्यात अक्षता मिसळून अथवा मृत असल्यास पाण्यात काळे तीळ मिसळून प्रत्येक नावास 3 वेळा ओजंळीत थोडे पाणी घेऊन यमाच्या पुढील 14 नावांनी यमतर्पण करावे म्हणजे जमिनीवर सोडावे. मंत्र - ''यमाय धर्मराजाय मृत्यवे चातकायच वैवस्वतायकालाय सर्वभुतक्षयायच । औदुंबरायदध्नायनीलायपरमेशिठने वृकोदरायचित्राय चित्रगुप्तायवैनम: ।।  जर हा मंत्र कठीण वाटत असला तर नुसते यमराजाची 14 नावे पुढील प्रमाणे 1) यमं 2) धमराजं 3) मृत्युं 4) अंतकं 5) वैवस्वतं 6) कालं 7) सर्वभूतक्षयकरं 8) औदुंबरं 9) दध्नं 10) नीलं 11) परमेशिठनं 12) वृकोदरं 13) चित्रं 14) चित्रगुप्तं षेवटी तर्पयामि नम: असे म्हणत प्रत्येक नावास 3 वेळा ओजळीत पाणी घेवून जमिनीवर सोडावे या क्रियेस 'यमतर्पण असे म्हणतात. नंतर दक्षिणेकडे तोंड करून ''यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: । भूताधिपो दत्त कृतानुसारी कतांत एतíषभिर्जपंति । या श्लोकाचा दहा वेळा उच्चार करावा. 
लक्ष्मी व कुबेर कृपाप्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवसाची सुरूवातसुध्दा दि.  1 नोव्हें. 2013 ला सायं. 7.39 पासून 2 नोव्हेबर 2013 ला सायं. 07.06 पर्यंत आहे. दर्श अमावस्येची सुरूवात दि. 2 नोव्हेंबरला रात्री 08.13  पासून दि. 3 नोव्हेंबरला सायं. 06.20 पर्यंत आहे. तेव्हा लक्ष्मी व कुबेर पूजन हे प्रदोशकाळी म्हणजे दि. 2 नोव्हेंबर 2013 ला संध्याकाळी 05.57 ते 07.09 या दरम्यान केल्यास उत्तम फलप्राप्ती होर्इल. या पूजनार्थ लक्ष्मी मंत्र 'ओम श्रीम नम: व कुबेर मंत्र 'ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्यादी पतये धनधान्य समृध्दीं मे देहि दापय स्वाहा या मंत्राचा श्रध्दापूर्वक 108 वेळा जप करावा अथवा अग्नीत षुध्द तुपाच्या किंवा कमलबीजाच्या आहुत्या धाव्या. जप करण्यासाठी सिध्द कमलगठठा माला किंवा स्फटिक, रुद्राक्ष, मुंगा माला हीचा वापर करावा याने फलप्राप्तीचे प्रमाण वाढून जप सिध्दत्वास जातो. सिध्द श्रीयंत्र, कुबेर यंत्र व जपमाळेसाठी आपले नाव, आपल्या संपूर्ण पोस्टल पत्ता व  हवी असलेली साधना साम्रगीचे नाव स्पष्ट लिहून 8890543002, 8890543005 या नंबरवर एसएमएस करावा. साम्रगी मागविण्यापूर्वी किंमत व इतर चौकशीसाठी 0291-2433623, 2432209 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. वरील सर्व सिध्दसाहित्य आपणास घरपोच वी.पी.पी.ने प्राप्त होतील. आध्यात्मिक  साधना, कुंडली, वास्तु परिक्षण, रत्न, दोषशांती पूजनार्थ अथवा आध्याक कोणत्याही शंका समाधानासाठी मुलाखतीची घेवून ज्योतीष्याचार्य डॉ. सुहास रोकडे यांच्याषी संपर्क साधावा. 

ज्योतीष्याचार्य डॉ सुहास रोकडे
astrotechlab@gmail.com
M: M8862072690 

No comments:

Featured Post

Read Google books-Astrologer Dr.Suhas

www.astrotechlab.weeebly.com >