Saturday, October 3, 2015

ब्रम्हांड चिंतन

रोचक सत्य

आपले पृथ्वीवरील वय १२ वर्षांचे असेल, तर गुरूवर ते १ वर्ष असेल. गुरूचे १ वर्ष १२ पृथ्वी वर्षाइतके असते.
प्लुटो ग्रहावर तुम्ही राहात असाल, तर तुमचा पहिला वाढदिवस २४८ वर्षांनी येईल. प्लुटोचे एक वर्ष २४८ पृथ्वी वर्षाइतके आहे.
पृथ्वीचा व्यास आहे १२७५६ किलोमीटर.
प्रकाशाचा वेग आहे एका सेकंदाला ३ लाख किलोमीटर. घड्याळात टिक् टिक् असा जो आवाज होतो, (एका सेकंदाचा) दोन आवाजातील वेळात प्रकाश पृथ्वीभोवती आठ प्रदक्षिणा घालू शकतो.
अंतराळयान पृथ्वीला साधारणपणे ९० मिनिटात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे अंतराळायात्री या एका प्रदक्षिणेमध्ये एक सूर्योदय आणि एक सूर्यास्त पाहू शकतो. म्हणजे २४ तासांच्या एका दिवसामध्ये अंतराळवीर १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहू शकतो.
आपण कल्पनेनेच गुरूजवळच्या ‘आय ओ’ उपग्रहावर जाऊ. तिथून सूर्यबिंब पृथ्वीवरून दिसते त्याच्या एकपंचमांशइतकेच दिसेल. पण, तिथून घडणारे गुरूचे दर्शन मात्र थक्क करणारे असेल. कारण पृथ्वीवरून चंद्र दिसतो त्याच्यापेक्षा ४० पटीने मोठा, गुरू आपल्याला दिसेल.
बुध आपल्या आसाभोवती फिरायला ५८-५९ दिवस घेतो, तर सूर्य प्रदक्षिणा करायला जवळजवळ ८८ दिवस घेतो. शिवाय त्याची आसाभोवती फिरायची दिशा सूर्य प्रदक्षिणेच्या दिशेच्या जवळजवळ समांतर आहे. या दोन गतीचा संयुक्त परिणाम म्हणजे बुधाचा दिवस-रात्रीच्या चक्राचा म्हणजे सूर्यास्त ते सूर्यास्ताचा कालखंड जवळजवळ १७६ दिवस, म्हणजे वर्षकाळाच्या दुप्पट, तर आसाभोवतीच्या आवर्तन काळाच्या तिप्पट आहे.
शुक्राच्या आसाभोवतीचा आवर्तन काळ (२४३ दिवस) त्याच्या वर्षापेक्षा मोठा आहे. (२२४ दिवस). शिवाय त्याचा आस जवळजवळ उलटा असल्याने तो उलटा फिरताना दिसतो. म्हणजे शुक्रावरून सूर्याचे भ्रमण एक तर फारच हळू दिसेल आणि तेही पश्‍चिमेकडून पूर्वेकडे. शुक्रावर सूर्यास्त ते सूर्यास्त असा दिवस-रात्रीचा कालखंड सुमारे ११७ दिवसांचा आहे.
युरेनसचा ध्रुवीय आस १० अंशाहून जास्तच कललेला असल्याने, त्याचा एक ध्रुव ४२ वर्षे सतत सूर्यप्रकाशात न्हाऊन निघतो, तर त्यानंतर दुसर्‍या ध्रुवाला ही सुविधा तितक्याच काळ उपभोगता येते. त्या वेळी अर्थातच पहिला ध्रुव अंधारात असतो.
विश्‍वात सर्वच गोष्टी गतिमान आहेत. आपल्याला स्थिर वाटणार्‍या वस्तूंनादेखील विश्‍वाच्या सापेक्ष गती आहेत. कारण आपली पृथ्वीदेखील गतिमान आहे. सूर्य, तारे, आकाशगंगा असणारे सगळे विश्‍व गतिमान आहे. आपणही या गतिमान विश्‍वाचा भाग आहोत.
चंद्र २९.५ दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांत एक प्रदक्षिणा मारते, तर ३६५ दिवसांत (एक वर्ष) ती सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. सूर्यसुद्धा स्वतःभोवती २५ दिवसांत एक फेरी मारतो. ज्या प्रमाणे आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याप्रमाणे सूर्यदेखील आकाशगंगेच्या केंद्राभोवती एक लाख प्रतितास एवढ्या अफाट वेगाने आपल्या सूर्यमालेसह फिरत आहे. सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुमारे २५ कोटी वर्षांत एक फेरी मारतो. यालाच एक वैश्‍विक वर्ष (गॅलेक्सी इयर) म्हणतात.
मुक्तिवेग :
उपग्रहाला घेऊन जेव्हा एखादा अग्निबाण अवकाशात सोडला जातो, तेव्हा त्याची गती एवढी ठेवली जाते की, अग्निबाण गुरुत्वाकर्षणाच्या कचाट्यातून मुक्त होऊन अवकाशात पुढे जात राहील. या गतीला मुक्तिवेग म्हणतात. प्रत्येक ग्रहाचा मुक्तिवेग भिन्न असतो.
पृथ्वीचा मुक्तिवेग दर सेकंदाला ११.२ किलोमीटर आहे. म्हणजे एखादी वस्तू दर सेकंदास ११.२. किलोमीटर एवढ्या वेगाने आकाशात फेकल्यास ती वस्तू जमिनीवर न पडता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून, अंतराळात जाऊ शकते. आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहांचे मुक्तिवेग पुढीलप्रमाणे आहेत :
तुम्ही पृथ्वीच्या आकाशात सूर्य कधी पश्‍चिमेस उगवताना पाहिला आहे काय? नाही ना. जर तुम्हाला तसा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला शुक्रावरच जावे लागेल! शुक्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शुक्रावर होणारा सूर्योदय होय. आपल्या पृथ्वीवर सूर्योदय पूर्वेस होऊन तो पश्‍चिमेस मावळतो. पण, शुक्रावर मात्र याच्या नेमकं उलट घडतं. म्हणजे शुक्रावर सूर्यादय हा पश्‍चिमेस होतो. याचे कारण, शुक्र हा पूर्वेकडून पश्‍चिमेकडे फिरत असतो तसेच त्याच्या फिरण्याचा मार्ग म्हणजेच त्याचा गृहपथ हा सुमारे १७७.३६ अंशांनी कललेला आहे. शुक्र व युरेनस हे ग्रह सोडून सूर्यमालेतील इतर ग्रह हे पश्‍चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात.
सूर्याच्या गाभ्यापासून सूर्याच्या पृष्ठभागापर्यंतचे ६ लक्ष ९६ हजार किलोमीटर्स अंतर पार करण्यासाठी ऊर्जालहरींना सरासरीने पाच कोटी वर्षांचा काळ लागतो. एकदा या ऊर्जालहरी पृष्ठाशी पोहोचल्या, की मग मात्र त्या सेंकदाला ३ लक्ष किलोमीटर वेगाने अवकाशातून प्रवास करू लागतात.
सूर्याच्या गाभ्यातून पृष्ठाशी ऊर्जा येण्याची क्रिया इतकी मंद आहे की, काही आकस्मिक कारणांनी सूर्याच्या गाभ्यातील ही अणुभट्टी एकाएकी बंद पडली, तरी सूर्यापासून बाहेर पडणारी प्रारणे थांबायला, म्हणजेच सूर्य पूर्णपणे विझण्यासाठी काही कोटी वर्षं लागतील.
मंगळावरील पर्वत आपल्या माउण्ट एव्हरेस्टच्या जवळपास तिप्पट उंच आहेत, तर तेथील दर्‍या, विवरे हे आपल्याकडील दर्‍याखोर्‍यांपेक्षा अधिक भयानक आहेत.
मंगळाच्या पृष्ठभागावर विराजमान असलेला ‘ओलम्पस मोन्स’सारखा विशाल पर्वत अख्ख्या सूर्यमालेत नाही. त्याची उंची सुमारे ९०,००० फूट म्हणजे आपल्या माउण्ट एव्हरेस्टच्या तिप्पट आहे. त्याच्याकडे पाहताना आपल्या डोक्यावरची टोपी खाली पडेल!
आकाशाशी स्पर्धा करणार्‍या या पर्वतासोबतच, पाताळाला स्पर्श करणारी अतिखोल दरी- ‘मरीनर दरी’ हीसुद्धा मंगळाच्या पृष्ठभागाचे एक आगळेवेगळे आश्‍चर्य आहे. या विशाल दरीची लांबी सुमारे ५ कि.मी. असून, ती सुमारे ४० हजार फूट खोल आहे.
सूर्यमालेतील इतर ग्रहावरील तुमचे वजन
अवकाशात गुरुत्वाकर्षण शून्य आहे. त्यामुळे अवकाशात मानवाची अवस्था वजनरहित असते. त्याचप्रमाणे इतर ग्रहावरदेखील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत कमीजास्त असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण एक मानले, तर सूर्यमालेतील इतर ग्रहावरील गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवरील ५० किलो माणसाचे वजन त्या ग्रहावर पुढीलप्रमाणे असेल :
चंद्र हा पृथ्वीच्या आकारमानाच्या तुलनेत लहान आहे. त्याचे वजन पृथ्वीच्या वजनाच्या १/८१ आहे. त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या मानाने १/६ आहे. माणूस चंद्रावर गेला, तर त्याचे वजन हे पृथ्वीवरील वजनाच्या तुलनेत १/६ असेल. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीपेक्षा १/६ इतके कमी असल्याने तिथे हलके हलके वाटते. ५० किलो इतके वजन असणार्‍या माणसाचे वजन चंद्रावर फक्त ८.५० किलो भरेल. या उलट गुरू ग्रहावर गुरुत्वाकर्षणाचे जबरदस्त आकर्षण जाणवेल. गुरू ग्रहावर आपल्याला आपले वजन २.५४ पटीने वाढलेले जाणवेल. कल्पना करा, ५० किलो वजनाचा एकदा माणूस गुरू ग्रहावर चालू लागला, तर त्याचे वजन सुमारे १२७ किलो असेल. म्हणजे केवळ आपल्या वजनाच्या भारामुळेच तो खाली कोसळेल. सूर्यावर ५० किलो वजनाच्या माणसाचे वजन १४०० किलो असेल. अशा प्रचंड वजनाच्या भारामुळे तो माणूस हलूसुद्धा शकणार नाही. त्याला 

ज्योतिष्याचार्य
डॉ.सुहास रोकडे
www.astrotechlab.weebly.com

(मुळ संकलन : अविनाश लिंगे)

No comments:

Featured Post

Read Google books-Astrologer Dr.Suhas

www.astrotechlab.weeebly.com >