Monday, July 30, 2018

कृष्णवचन

तक्रार करायची का?


महाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:

कर्ण कृष्णाला विचारतो - " माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,
कारण मी अनौरस संतती होतो.
यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,
कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.

कारण मी क्षत्रिय होतो.

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि
गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.
धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही
त्यावेळी आपण कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून मित्रानो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!💐💐💐💐💐

☕☕☕☕☕

www.astrotechlab.com

Thursday, July 26, 2018

गुरु पुर्णिमा - कैसे करे गुरु ? -ज्योतिष्याचार्य डॉ.सुहास


गुरु पूर्णिमा


गुरु नहीं है तो क्या चिंता,
इनको बनाईये अपना गुरु

हनुमानजी


श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार |
बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि |
बुद्धिहीन तनु जानि के, सुमिरौ पवन कुमार |
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहुं कलेश विकार।

गोस्वामी तुलसीदास ने हनुमान चालीसा के प्रारम्भ में ही इस दोहे के माध्यम से अपने श्रीगुरु हनुमान जी के प्रति श्रद्धा व्यक्त कर दी है। गोस्वामी तुलसीदास ने इसी के साथ ही यह भी बता दिया कि गुरु वंदना से क्या लाभ होते हैं। गुरु से प्रार्थना की, कि वह उनके सारे क्लेश मिटा दें। वास्तव में यही गुरु महिमा है। उपनिषदों से गुरु शब्द की उत्पत्ति हुई है। गु का अर्थ है अज्ञान और रु का अर्थ है अज्ञान को मिटाने वाला, प्रकाश देने वाला। जो अज्ञानता से ज्ञान की ओर ले जाए औरजो अंधकार से प्रकाश की ओर ले जाए, वही गुरु है। श्रीमदभागवत में भगवान श्रीकृष्ण भी कहते हैं कि इष्ट से मिलाने का कार्य गुरु ही करते हैं।

किसको बनाएं गुरु, यह सवाल सबको सताता है। गुरु पूर्णिमा के अवसर पर यह आवश्यक नहीं कि किसी व्यक्ति विशेष को ही गुरु बनाया जाए। आप किनको गुरु बना सकते हैं, इसके विकल्प भी मौजूद हैं। संतगण कहते हैं कि गुरु ऐसा हो, जो सदा-सर्वादा के लिए हो। जिसके आप गुण देखें लेकिन दोष नहीं। गुरु को आपको सुलभ हो और आप समय-समय पर मार्ग दर्शऩ भी लेते रहें। यदि आपका कोई गुरु नहीं है तो आप इस प्रकार गुरु पूर्णिमा मना सकते हैं..

श्री हनुमान: जिस प्रकार गोस्वामी तुलसीदास जी के गुरु हनुमान जी हैं, उसी प्रकार आप भी हनुमान जी को अपना गुरु मान सकते हैं। हनुमान जी अष्ट सिद्धि और नौ निधियों के प्रदाता हैं। वह परम ज्ञानी हैं। परमवीर हैं। संकटमोचन हैं। उनकी शरण में जाने से शिष्यों के सारे कष्ट दूर हो जाते हैं।

भगवान शिव


शंकर गुरु:, शंभो गुरु:, गुरु उमापती महेश्वर:, l
निराकार गुरु, साकार गुरु, गुरु महाकाल नागेश्वर: ll

हनुमान जी की तरह ही भगवान शंकर को भी आप गुरु बना सकते हैं। भोले बाबा सहज सरल हैं। वह प्रलंयकारी हैं। वह त्रिपुरारी हैं। न वह जटिल और न ही उनकी पूजा। भगवान शंकर को गुरु मानकर पूजा करने से सारे कष्टों से मुक्ति मिल जाती है। 

भगवान श्रीकृष्ण


आप भगवान श्री कृष्ण को भी अपना गुरु बना सकते हैं। योगीराज श्रीकृष्ण समस्त बाधाओं को दूर करने वाले हैं। वह परमज्ञानी हैं। परमवीर हैं। मददगार हैं। धर्म, अर्थ और मोक्ष के मार्ग दर्शक हैं। आप भगवान विष्णु को भी अपना गुरु बना सकते हैं। श्री गुरुदेव दत्तप्रभु को भी गुरुरुपेन स्विकार करके गुरुचरित्र के १४ अध्याय के ११,पाठ कर ले l पंचपाल का विडा चढाकर नमन करे l

धर्मग्रंथ- नवग्रह

धर्मग्रंथ केवल पठन-पाठन और वाचन तक सीमित नहीं हैं। धर्मग्रंथ हमको आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। पग-पग पर हमारा मार्ग दर्शऩ करते हैं। इसलिए, श्रीरामचरित मानस, भगवद्गीता आदि को आप गुरु मानकर पूज सकते हैं। इसी तरह नवग्रहों में से किसी एक को भी आप अपना गुरु बना सकते हैं।

कैसे लें गुरु दीक्षा ?

व्यक्तिगत गुरु दीक्षा तो आपके गुरु ही दिलाते हैं। लेकिन यदि आप अपने इष्ट को गुरु की संज्ञा देना चाहते हैं तो बहुत ही सरल उपाय है। हाथ में चावल, गंगाजल और कुछ दक्षिणा रखकर संकल्प लें और मंत्र पढें...ऊं गुरुवे नम:, ऊं हरि ऊं। मन ही मन संकल्प लें कि आज से आप हमारे गुरु हैं। हमने आप से दीक्षा ली हैं। हमारे घर परिवार में सुख-शांति बनाएं और हमारा कल्याण करें। हनुमान जी को गुरु बनाने वाले गुरु पूर्णिमा के दिन गुरु पूजन करें या कराएं, चोला चढाएं। इसी तरह भगवान शंकर, भगवान विष्णु और भगवान श्रीकृष्ण भक्त गुरु पूजन कराएं। अंत मे क्षमा याचना प्रार्थना कर ले l

जय गुरुदेव !

-ज्योतिष्याचार्य डॉ.सुहास रोकडे
www.astrotechlab.com
 

Wednesday, July 25, 2018

कलीयुग विचारक हरी

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे? 


एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. 
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. 
       या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. 
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. 
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.
      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. 
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. 
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. 
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. 
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.
      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. 
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. 
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

Astrotech Lab

www.astrotechlab.com

Friday, July 6, 2018

Secret of brain washing

             vyanky
हे आर्टिकल थोडे मोठे आहे, मात्र जे लोकं स्वतःला जागरूक नागरिक समजतात त्यांनी हा लेख जरूर वाचावा.
How to brainwash a nation?
'रावणाचे ग्लोरिफिकेशन' ह्या विरोधात मी फेसबुकवर दोन पोस्ट्स केल्या होत्या. त्यानंतर एका ग्रुपवर ह्या विषयावर चर्चा चालू होती. एकंदरीतच रामाला आपल्या देशात विरोध कसा काय होऊ शकतो हा मुद्दा होता. त्या ग्रुपवर सौरभ वैशंपायनने त्यावेळी 'सबवर्जन' हा विषय काढला. सबवर्जन सोबत जोडून नाव आलं - 'युरी बेझमेनोव्ह' उर्फ 'टॉमस शुमन'.
युरी बेझमेनोव्ह ह्या माणसामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याविषयी अव्हेलेबल असलेले सर्व व्हिडीओज शोधून काढले, डाउनलोड करून बघितले.
युरीने जे काही मांडले आहे, त्याने डोकं चक्रावून गेलं.
"ऑ!! असंही असू शकतं? हे सर्व इतकं प्लॅनड असू शकतं?" ह्या प्रश्नाने भंडावून जायला झालं.
भारतात सध्या जे चालू आहे आणि आधी जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्व आहे.
त्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडसं.
युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.
कॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.
नंतर १९६० च्या दशकात युरी रशियाच्या केजीबी ह्या गुप्तहेर संस्थेत रुजू झाला. भारताविषयी अभ्यास असल्यामुळे केजीबीतर्फे त्याची नेमणूक भारतात करण्यात आली.
गुप्तहेरी करण्यासाठी युरी भारतात संपादक बनून आला. नंतर भारताच्या, इथल्या माणसांच्या, संस्कृतीच्या प्रेमात पडला. केजीबी जगभरात आणि भारतात जर काही करते आहे ते खूप चुकीचं आहे, कम्युनिस्टांच्या स्वार्थासाठी इतर देशांचा, तिथल्या लोकांच्या बळी जात आहे, ह्या जाणिवेने त्याने केजीबीला सोडचिठ्ठी दिली. जीव वाचवण्यासाठी भारतात हिप्पी बनून राहिला आणि नंतर कॅनडाला पळून गेला. १९९३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कसा ते कुणालाच समजलं नाही.Deception was my job" गुप्तहेर म्हणून तो करत असलेल्या कामाचं स्वरूप युरीने एका वाक्यात मांडलं आहे.
खोटं असलेलं खरं बनवून दाखवणं, समाजाला भुरळ पाडणं, आपल्या बोलावत्या सरकारला हवं ते चित्र उभं करणं आणि परक्या राष्ट्रांमध्ये जनमत आपल्याला हवं त्या बाजूला वळवणे, हे काम युरी आणि त्याच्यासारखे अनेक गुप्तहेर करत होते आणि आजही करत आहेत.
ह्या सर्वाला त्याने 'सबव्हर्ट' हा शब्द वापरला आहे. 
सबवर्जन हेच युरी आणि अनेक गुप्तहेरांचं काम आहे.
हि सबवर्जनची थिअरी 'सुन त्झे' ह्या एका चायनीज विद्वानाने २००० वर्षांपूर्वी मांडली.
रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शत्रूला काबीज करणं, त्याच्या देशात आपल्याला अनुकूल मत पैदा करणं आणि मग हळूहळू शत्रूला काबीज करून घेणं हा ह्या थिअरी मागचा गाभा आहे.
आता हे सर्व करायचं तर त्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी, त्याची एक मेथेडॉलॉजी असायला हवी. इतर देशांवर कंट्रोल करण्यासाठी केजीबी जे काही करत होती, किंवा आजही अनेक देश जे काही करत आहेत त्याची तपशीलवार माहिती युरीने त्याच्या मुलाखतीत दिली आहे. इंटेरेस्टिंगली सबवर्जन हि एक लॉंग प्रोसेस आहे आणि ह्या सर्व देशांकडे ती अमलात आणण्यासाठी लागणारा संयम आहे.
एखाद्या देशात राजकीय, आर्थिक वा सामाजिक अस्थैर्य निर्माण करणं हा सबवर्जनचा उद्देश आहे. गुप्तहेर संघटनांच्या बजेटपैकी ८५% निधी ह्यासाठी वापरला जातो.
जिथे सामाजिक सीमारेषा फार मजबूत नसतात, जिथे समाज हा फार जास्त विचारी नसतो, जिथे देशाचे राज्यकर्ते स्खलनशील असतात,  राजकीय नियंत्रण फार कमी असतं, त्या देशांना अश्या पद्धतीने नियंत्रणात आणणं फार सोपं असतं.
सबवर्जनमध्ये असणारी एकेक पायरी बघितली तर कोणत्याही सजग नागरिकाला ती पायरी उदहरणासाहित उमजून जाईल.
Demoralisation अर्थात समाजाचं खच्चीकरण करणे, हि एक पायरी त्यात आहे.
ह्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी आहे. एवढाच का? कारण ह्या कालावधीत एक पिढी शाळा कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडते. त्यावेळी आपल्याला हवे असलेली मूल्य त्यांच्यावर बिंबवली तर त्यांचा कल बदलता येतो. कोवळ्या मनांवर आपली मतं लादणे आणि आपल्याला हवा तो प्रोपोगंडा राबवणं हे ह्या पायरीत केलं जातं. मग त्यांच्या पुस्तकात चुकीची माहिती छापणे हाही त्यातलाच एक भाग. उदाहरण डोळ्यासमोर आलं असेलच.
ह्याशिवाय समाजाचे असे जे आदर्श आहेत, ज्यांच्यावर सामान्यजन श्रद्धा ठेवून आहेत, त्यांना धक्का देणं, त्यांच्याविरुद्ध चुकीची विद्रोही माहिती पसरवणे हाही एक अजेंडा. असं झालं कि मग कर्ण चांगला वाटू लागतो, रावण हाही भाऊ असावा असा वाटतं आणि महिषासुर दिन साजरा केला जातो. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणं हा हेतू साध्य होऊ लागतो.
धार्मिक मान्यता, शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, अडमिनिस्टरेशन सिस्टीम, कायदा आणि सुव्यवस्था, कामगार यंत्रणा गढूळ करून असंतोष पैदा करणं हा देखील ह्याच पायरीचा भाग. मग त्यात आजूबाजूला चालू असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी, समाजघातक चळवळींना पाठिंबा दिला जातो.
वैचारिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांपेक्षा अविचारी, आततायी, प्रसिद्धीलोलुप लोकांना हेरून मोठं केलं जातं.
त्यात 'मीडिया' हा एक मोठा भाग हातात घेतला जातो. सर्वसामान्य दर्जाचे पत्रकार समाजाचा आणि देशाचा आवाज बनवले जातात. खोट्या आणि एकसुरी बातम्या मीडियामधून वारंवार प्रसारित केल्या जातात. समाजात अस्थैर्य निर्माण होईल असे सर्व प्रयत्न मिडियाद्वारे करवले जातात.
राजकीय सत्ता आणि न्यायव्यवस्था गढूळ केल्या जातात. पद्धतशीर रित्या गुंडांचं ग्लॅमरायझेशन केलं जातं. गुंड प्रवृत्तीची माणसं हीच हिरो वाटायला लागतात. सत्शील, सदप्रवृत्त माणसाला बावळट आणि कुचकामी ठरवलं जातं. गुंड हे समाजशोषक नसून त्यांच्या परिस्थितिचे बळी आहेत, असं भासवलं जातं.
अतिसामान्य वकुबाची माणसं समाजाचं नेतृत्व हातात घ्यायचा प्रयत्न करतात.
शिक्षणाचं केंद्र असणारी कॉलेजेस अथवा विद्यापीठं ह्यात शिक्षण दुय्यम केलं जातं आणि प्राचार्य आणि विद्यार्थी, सरकार आणि विद्यार्थी ह्यांच्यात बेबनाव माजवला जातो.
स्त्रीवादि, समलिंगी, विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या राहतात. समाजाला अचानकरीत्या त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते.
एकंदरीत समाजात अशांतता माजवण्याचे, परकीय विचारसरणी बिंबवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले जातात.
ह्यालाच युरी 'Destabilization' असं म्हणतो.
Destabilization नंतर राजकीय कंट्रोल आणि मग आपल्याला हवा असलेला अजेंडा त्या देशात राबवणे.
एकदा समाजाचा कंट्रोल हाती आला कि समाजातील जी काही प्यादी अशांतता माजवण्यास उपयोगी पडलेली असतात त्यांनाच पद्धतशीररीत्या संपवलं जातं.  नवीन राज्यकर्त्यांना त्या व्यक्तींची वा चळवळीची गरज राहिलेली नसते.
सबवर्जनसाठी उपयोगी पडणार्या सामाजिक घटकांची एक यादीच युरीने एका दुसरया इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे.  हि यादी ऐकली/ वाचली तर धक्काच बसेल.
चित्रपटक्षेत्रातली मंडळी, स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारे लोकं, स्वत:भोवती वलय उभं करून स्वत:चं  महत्व समाजात वाढवणारे स्वार्थी खोटारडे लोकं ह्यांचा उपयोग समाजात अस्थैर्य  निर्माण करण्यासाठी केला जातो.
युरी म्हणतो, ह्या सर्वाला थांबवायचा उपाय आहे. आणि तो म्हणजे हे चालू होत असतानाच थांबवणे. ज्यावेळी समाजाची बेसिक मुल्य परदेशीमूल्यांच्या पंखाखाली जाऊ लागतात त्या आधीच ते थांबवणं महत्वाचं असतं.
भारतात लहान मुलांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास छापून येतो, त्यांच्या कोवळ्या मनावर आणि बुद्धीवर फुटीरतेचे संस्कार केले जातात, अचानक कुणीतरी कोलेजातली मुलं एकदम मोठी होतात, त्यांना समाजाचं नेतृत्व मानलं जातं, मीडियातून एकाच बाजूच्या बातम्यांचा मारा होतो, चित्रपट क्षेत्रातली मंडळींना देश आपला वाटेनासा होतो- ह्या आणि अशा अनेक घटनांचं जणू भाकीत युरीने आपल्या मुलाखतीत मांडलं आहे.
आपल्या देशातल्या घटना असो वा इजिप्तमधली सो कॉल्ड राज्यक्रान्ति- सर्वांचा क्रम एकसारखा आहे.
रशियासारख्या देशाच्या एका एजंटने हि माहिती उघड उघड मांडली आहे. ह्यापलीकडे चालणार्या अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे असतील आणि त्या आपल्याला उभ्या आयुष्यात समजणार देखील नाहीत.
एखादा माणूस जीव तोडून सत्य लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो पण आपल्यावर असलेल्या खोट्याच्या प्रभावामुळे आपण सत्य स्वीकारत नाही. ह्याच गोष्टीला युरीने ideological subversion असं म्हंटलं आहे.
त्यामुळे समाजात घडणाऱ्या घटनांनी आपण जर भारावून जात असू किंवा त्याच बरोबर आहेत हे आपल्याला वाटत असेल तर आपण 'सबवर्ट' झालो आहोत, असत्याचा

References- युरी बेझमेनोव्हच्या मुलाखती

आंतरजालावरील माहिती

Featured Post

Read Google books-Astrologer Dr.Suhas

www.astrotechlab.weeebly.com >